आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरस्थिती:25 गावांना देणार सायरनद्वारे पूरस्थितीची सूचना ; 50 हजार ते 1 लाख क्युसेक विसर्ग होताच अलर्ट करणार

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर हतनूर धरणावर पूरनियंत्रण कक्ष सुरु झाला आहे. हतनूर धरणाचे बुडीत क्षेत्र तसेच धरणातून विसर्ग झाल्यावर तापी काठावरील गावांना या कक्षातून माहिती दिली जाईल. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने पूर नियंत्रण कक्षात बसवलेल्या वायरलेस प्रणालीवर तापी काठावरील २५ गावे जोडली आहेत. त्यामुळे धरणातून ५० हजार ते १ लाख क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग झाल्यास या कक्षातून सायरन द्वारे धोक्याची सूचना देण्यात येईल. हतनूर धरणावर बुधवारी (दि.१) शाखा अभियंता एस.जी.चौधरी यांच्या उपस्थितीत पूर नियंत्रण कक्ष सुरू झाला. ३१ ऑक्टोबरपर्यंत हा कक्ष कार्यान्वित राहील. तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने हतनूरच्या खालील भागात तापी काठावर असलेल्या २५ गावांमध्ये धोक्याची सूचना देणारे वायरलेस सायरन बसवले आहेत. याचे नियंत्रण हतनूर धरणावरील पूर नियंत्रण कक्षातून केले जाईल. मोठी पूर स्थिती किंवा ५० हजार क्युसेक पेक्षा अधिक विसर्ग तापी नदीत झाला तर नियंत्रण कक्षातून २५ गावांमध्ये बसवलेल्या सायरनमधून धोक्याची सूचना मिळेल. तापीच्या पुराची पातळी वाढण्याच्या सूचनेमुळे ग्रामस्थ खबरदारी घेतील. बुधवारी या कक्षाचे उद््घाटन झाले. यावेळी शाखा अभियंता एस.जी.चौधरींसह ज्युनिअर क्लार्क श्रीराम पाटील, लिपिक नीलेश बिरपन, वायरमन गणेश सोनवणे, जे.बी.कोळी, अरुण पाटील उपस्थित होते.

दर तासाची माहिती अपडेट, उपाय करणे सोयीचे हतनूर धरणात येणाऱ्या पाण्याची स्थिती, विसर्ग, गेट ऑपरेशन आदींची दर तासांची माहिती या नियंत्रण कक्षात अपडेट केली जाईल. या सोबतच जिल्हास्तरावर असलेल्या तापी खोरे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती कळवली जाईल. यासोबतच महसूल व शासनाच्या विविध कार्यालयांना तापीच्या विसर्गाबाबत नियंत्रण कक्षातून पूर स्थितीबाबत माहिती दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...