आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याचा प्रश्न:आठवडाभरात आढळले डेंग्यूचे सहा नवीन रुग्ण ; 1990 घरांची तपासणी

भुसावळ12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह तालुक्यात गेल्या आठवड्यात डेंग्यूचे ६ रुग्ण आढळले. किन्ही, साकरी, शिंदी, दीपनगर औष्णिक केंद्र वसाहतीमधील प्रत्येकी एक, तर शांतीनगर व हुडको कॉलनीतील रानातला महादेव मंदिर परिसरातील प्रत्येकी एक असे हे ६ रुग्ण आहेत. यानंतर पालिका व तालुका आरोग्य विभागाने डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या भागात १९९० घरांमध्ये कंटेनर सर्वेक्षण केले.

पावसात डेंग्यूला कारणीभूत एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती वाढते. यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढतात. गेल्या आठवड्यात जामनेर रोडवरील हुडको कॉलनी रानातला महादेव मंदिर परिसरातील दोन बालकांना डेंग्यू झाला होता. उपचार घेऊन ते बरे झाले. आता शहरासह तालुक्यात पुन्हा डेंग्यूने डोके वर काढले आहे. शहरातील शांती नगर भागातील अपार्टमेंट, रानातला महादेव मंदिर, किन्ही, शिंदी, साकरी या ठिकाणचे रुग्ण उपचार घेत होते. सोमवारी पुन्हा दीपनगर वसाहतीमध्ये एक रुग्ण आढळला.

१९९० घरांची तपासणी
शहर व तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये आरोग्य विभागाने कंटेनर सर्वेक्षण सुरु केले. गेल्या आठवडाभरात १९९० घरांमधील ५ हजार ५७७ कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यात ७२ घरांमध्ये ८६ कंटनेर दूषित आढळले. आरोग्य विभागाने हे कंटेनर नष्ट केले. किन्ही भागातही डेंग्यूचा उद्रेक वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...