आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य रेल्वेने चार गाड्यांना प्रत्येकी एक स्लीपर कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भुसावळ येथून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. ०२१८७ रिवा-सीएसटी मुंबई उन्हाळी विशेष गाडी व ०२१८८ सीएसटी-मुंबई-रिवा उन्हाळी विशेष गाडीचा समावेश आहे. या गाडीला आता एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, दोन गार्ड््स ब्रेक व्हॅनसह सहा सामान्य द्वितीय श्रेणी बोग्या जोडण्यात येतील. तसेच २२१५७ सीएसटी-मुंबई-चेन्नई एग्मोर मेल, २२१५८ चेन्नई एग्मोर-सीएसटी, मुंबई मेल गाडीला आता एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी बोगी जोडण्यात येतील. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या व रिवा येथे जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळेल. प्रवाशांनी लाभ घ्यावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.