आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ विभागात केले आंदोलन:रावेरात अजित पवार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी, कारवाईची मागणी

रावेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा निषेध केला. त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सरचिटणीस सी.एस.पाटील, जितू पाटील, सुनील पाटील, प्रसिद्धिप्रमुख नितीन पाटील, दिलीप पाटील, अमोल पाटील, अरुण शिंदे, मनोज श्रावक, ॲड.सूर्यकांत देशमुख, संदीप सावळे, हरलाल कोळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...