आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र आंदोलनाचा इशारा:खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवा ; शिवसेना

भुसावळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रात्री सुरू झालेल्या पावसाने वीजपुरवठ्याचा बोजवारा उडाला. ही समस्या वारंवार निर्माण होते. महावितरणने हे सर्व तांत्रिक प्रश्न सोडवावे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे, हेमंत खंबाईत, विधानसभा शेत्राप्रमुख नीलेश महाजन, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ आदींसह शिवसैनिकांनी सोमवारी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे, शहर विभागाचे अभियंता जी.टी.महाजन यांची भेट घेतली.

भुसावळ शहरात वारंवार छोट्या मोठ्या पावसात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्व ठिकाणी दुरुस्तीची कामे पूर्ण करावी. जेणेकरून पुढील काळात अशी समस्या पुन्हा निर्माण होणार नाही. तसेच गडकरी नगरमधील नवीन पाण्याच्या टाकीजवळ डीपी मध्ये सातत्याने बिघाड होतो. तेथे नवीन डीपी बसवावी अशी मागणी केली. भुसावळ शहर प्रमुख दीपक धांडे, सोनी ठाकूर, राकेश खरारे, पिंटू भोई, प्रा. विनोद गायकवाड, अॅड. कैलास लोखंडे, कडू चौधरी, योगेश बागुल, मनोज पवार, स्वप्नील सावळे, मेहमूद शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...