आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद:औरंगाबादच्या प्रवाशांचे 18 मिनिटे वाचणार, अंकाईजवळ जोडली दक्षिण-मध्य रेल्वे लाइन

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाडपासून औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे इंजिन बदलण्याची प्रक्रिया मनमाडला व्हायची. मात्र, शनिवारी अंकाईजवळ रेल्वे लाईन जाेडण्यात आली. त्यामुळे आता इंजिन बदलण्याची प्रक्रिया करावी लागणार नाही. गाडीला आधी जोडलेले इंजिन शेवटपर्यंत जाईल. त्यामुळे प्रवाशांचा १८ मिनिटांचा वेळ वाचेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहाेटी यांनी मनमाड स्थानकाची पाहणी करताना सांगितले.

आतापर्यत मनमाड येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे इंजिन बदलावे लागत हाेते. अंकाईजवळ रेल्वे लाइन जाेडलेली नसल्याने ही प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून कायम हाेती. मात्र, आता दक्षिण व मध्य रेल्वे लाइन जाेडली गेल्याने मनमाडला इंजिन बदलवण्याची गरज पडणार नाही. परिणामी मनमाड स्थानकावर २० मिनिटे थांबणारी रेल्वे गाडी आता तेथे केवळ दोन मिनिटे थांबेल. यामुळे १८ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

बातम्या आणखी आहेत...