आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखाद्यतेलाचे दर गेल्या महिन्यापासून घसरले होते. मात्र, गेल्या चार दिवसांत सोयाबीन तेलाने पुन्हा उसळी घेतली. त्यात प्रती लिटर ८ रुपये, तर १५ किलोच्या डब्या मागे १०० रुपयांची वाढ होऊन तो २२३० रुपयांपर्यंत गेला.
गेल्या आठवड्यापर्यंत सोयाबीन तेल १८५ रुपयांवरून थेट १२८ रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र, गेल्या चार दिवसांत सोयाबीन तेल प्रतिलिटर ८ रुपयांनी वाढले. तर पाच दिवसांपूर्वी १५ किलो वजनाच्या सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर २१३० होते, ते आता २२३० झाले. यापूर्वी एप्रिल महिन्यात ४५ रुपये किलो असलेला साबुदाणा ऐन श्रावणात ७० रुपये किलोपर्यंत गेला. जिरे गेल्या तीन महिन्यांपूर्वी २०० रुपये होते, त्यात १०० रुपयांची वाढ झाली. खसखस, टरबूज मगज बी, अजानामोटूचे दर वाढल्याचे व्यापारी निर्मल कोठारी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.