आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीड ते दोन महिन्यांपासून तेलाच्या दरात माेठी वाढ झाली होती. मंगळवारी उघडलेल्या बाजारात सोयाबीन तेलाचे ९०० एमएलचे पाऊच १४ रुपयांनी स्वस्त झाले. तर १५ किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर अडीचशे रुपयांनी खाली आले. हे दर कमी हाेण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील पाम तेलाच्या दरातील घसरणीसोबत स्थानिक पातळीवर सर्वच तेलबियांची आवक वाढल्याचा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
तेलाचे भाव कमी झाल्याने दर महिन्याच्या किचन बजेटमध्ये ६० ते ७० रुपयांची बचत होणार आहे. गेल्या दीड महिन्यात हे बजेट किमान शंभर दीडशे रुपयांनी वाढले होते. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत सोयाबीन तेल प्रती पाऊचे दर १४२ रुपये होते. ते मंगळवारी १२७ रुपये झाले. संयुक्त कुटुंबाला जास्त प्रमाणावर लागणाऱ्या तेलाची गरज भागवण्यासाठी पंधरा किलोचा डबा घेतला जातो. या डब्याचे दर गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत २४०० रुपयापर्यंत गेले होते. ते मंगळवारी २५० रुपयांनी कमी होऊन २,१५० रुपयापर्यंत खाली आले. सर्वच खाद्यतेलात काही प्रमाणात पामतेल समाविष्ट केले जाते. त्याचे दर कमी अधिक झाले की सर्वच तेलांच्या दरामध्ये चढ-उतार होतात. विशेष म्हणजे दिवाळीच्या आधीपासूनच तेलाच्या दरात वाढ सुरू होती. आता ते पहिल्यांदाच घसरले आहेत.
साेयाबीन उत्पादन किती येते ते महत्त्वाचे साेयाबीन तेलाचे दर सध्या घसरले आहेत. सोयाबीन पिकाचे उत्पादन किती प्रमाणावर बाजारपेठेत येते? हे महत्वाचे आहे. पुढील काळात हे दर आणखी कमी होतील की हेच राहतील ते ठरू शकेल, असे जळगाव येथील घाऊक विक्रेता पीयूष बियाणी यांनी सांगितले.
घाऊक बाजारातील पामतेल घसरले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पामतेलाचे दर घसरल्याने देशातील घाऊक बाजारपेठेत गेल्या आठवड्यात ११० रुपये प्रति किलो मिळणारे पामतेल सोमवारी ९८ रुपयांपर्यंत खाली आले. त्याचा परिणाम मंगळवारी सोयाबीन तेलाचे दर घसरण्यावर झाला,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.