आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाढ:महिनाभरात सोयाबीन; सूर्यफूल तेलाच्या दरात 25  रुपयांनी वाढ

भुसावळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडका उडालेल्या सोयाबीन व सुर्यफूल तेलाचे दर दिवाळीनंतर कमी होतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. मात्र दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिनाभराची तुलना करता सोयाबीन व सूर्यफूल तेलाच्या दरात प्रतिलिटर २५ रुपयांची वाढ झाली. १२२ रुपये लिटरचे सोयाबीन तेल १४७, तर १५५ रुपये लिटरचे सूर्यफूल तेल आता १८० रुपयांवर पोहोचले आहे.

दिवाळीत फराळाचे साहित्य, खाद्यपदार्थ तळण्यासाठी तेलाची मागणी जास्त असल्याने दरवाढ झाली होती. मात्र, दिवाळीनंतर तेलाचे दर कमी होतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. हा अंदाज खोटा ठरून दर वाढते आहेत. ४ ऑक्टोबरला सोयाबीन तेलाचे दर १२२, तर सूर्यफूल तेलाचे दर १५५ रुपये लिटर होते. त्यात महिनाभरात २५ रुपयांची वाढ झाली. सोयाबीन तेलाच्या दरात आगामी काळातही तेजी राहण्याचा अंदाज व्यापारी निर्मल कोठारी यांनी व्यक्त केला. दरम्यान, एकीकडे सोयाबीन तेलाचे दर वाढले असताना शेतकऱ्यांच्या सोयाबीन दाण्यांना मात्र खर्चाच्या तुलनेत अत्यल्प भाव मिळत असल्याची ओरड आहे.

बातम्या आणखी आहेत...