आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलागुणांना मिळाला वाव:झांबरे विद्यालयात स्पंदन स्नेहसंमलेन रंगले‎ ; विद्यार्थ्यांनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातपुडा शिक्षण संस्था भुसावळ ‎संचालित दादासाहेब रामदास‎ गणपत झांबरे माध्यमिक विद्यालय, भुसावळ व कै. भालचंद्र धोंडू‎ पाटील प्राथमिक विद्यामंदिर, यांच्या ‎ ‎ संयुक्त विद्यमाने स्पंदन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन झाले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक ‎कार्यक्रमांचे सादरीकरण करुन‎ विविध गुणप्रदर्शन केले.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‎चेअरमन ए.एन. शुक्ल हे उपस्थित‎ होते. माजी उपनगराध्यक्ष युवराज‎ लोणारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे‎ उद्घाटन झाले. तसेच प्रमुख पाहूणे‎ म्हणून आबासाहेब चौधरी, माजी‎ नगरसेविका प्रतिभा वसंत पाटील,‎ सतीश सपकाळे, माजी नगरसेवक‎ मुकेश पाटील, दीपक धांडे, संस्थेचे‎ सेक्रेटरी बी.जी.सरोदे, संचालक‎ जे.एच.चौधरी, व्ही .एम .महाजन,‎प्राथमिक शाळेचे चेअरमन संजय‎ पाटील, हेमंत चौधरी,‎ एस.आर.झांबरे, पी. ए. शुक्ल,‎ दीपक चौधरी आदी सर्व मान्यवर‎ कार्यक्रमास उपस्थित होते. परीक्षक‎ म्हणून नितीन मोरे, रोहन कछवे‎ उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण‎ कलाविष्कारांनी नटलेल्या स्पंदनच्या‎ या कला मंचावर विद्यार्थ्यांनी आपले‎ विविध कलागुण सादर केले.‎ कार्यक्रमाचे आयोजन माध्यमिक‎ विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी.‎ कुमावत, पर्यवेक्षक एस.‎ डी.बावस्कर, प्राथमिक विद्यामंदिर‎ शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री‎ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली‎ करण्यात आले. सर्व‎ शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी‎ उपस्थित होते. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख एम.‎ एन. गुरचळ, शिल्पा केदारे, के. एम.‎ पाटील यांनी तर आभार भारती‎ बैरागी यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...