आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवी वसाहती-जवळ सहज आढळणारी चिमणी हा उष्ण रक्ताचा पक्षी असल्याने त्याला सुरक्षित घरटी आणि दिवसातून दोन ते तीन वेळा अंघोळ आवश्यक असते. निश्चिंत मनाने पडवीत गिरक्या मारणारी, गॅलरीत घरटे करणारी, आपले अंगण चिवचिवाटाने भरणारी चिमणी निसर्गाच्या परि-संस्थेतील महत्त्वाचा घटक असला तरी सर्वांच्या आवडीची चिऊताई हल्ली संकटात आहे. त्यामुळे चिमणीच्या संवर्धनासाठी २० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिवस साजरा होतो, अशी माहिती चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी दिली.
चिऊताईच्या संवर्धन मोहिमेत सहभागी होताना प्रत्येकाने शक्य तेथे पक्ष्यांसाठी मातीचे जल पात्र ठेवावे. कृत्रिम घरटी तयारी करण्याची गरज आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमारसह इतरत्र चिमणी पहावयास मिळते. भारतात ८ प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यात आपल्या भागातील “हाऊस स्पॅरो’ म्हणजेच लाकडी चिमणी होय. तिचे शास्त्रीय नाव पासेर डोमेस्टिकस असून पासेरिडी कुळातील आहे, असे महाजन यांनी सांगितले.
असे करू चिमणीचे संवर्धन
चिमण्यांसाठी कृत्रिम घरटे लावणे, उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी गच्चीवर मातीच्या भांड्यात पाणी ठेवणे, शेत परिसरामध्ये झाडे-झुडपांचे संवर्धन करणे, पिकांमध्ये कृत्रिम पक्षी थांबे किंवा मक्या सारखी आंतरपिके लावल्यास पक्ष्यांना बसण्यासाठी जागा तयार होते. त्याचा फायदा किडीच्या नियंत्रणासाठी होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.