आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ पंचायत समितीच्या ८ गणांसाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात माजी सभापती मनीषा पाटील यांचा हक्काचा वराडसीम गण राखीव झाला. तर चार विद्यमान सदस्यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला. विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तळवेल गणातील अनुसूचित जाती पुरुषाचे आरक्षण उठून तो गण आता ओबीसी, तर निंभोरा गण अनुसूचित जमाती ऐवजी आता सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाला आहे.
पंचायत समितीमध्ये प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, प्रभारी बीडीओ एकनाथ चौधरी, नायब तहसीलदार अंगद आसटकर, भाऊसाहेब शिरसाठ, राजेंद्र फेगडे आणि राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रुजल चौधरी या बालकाच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.दरम्यान, सुधारित रचनेनुसार तालुक्यात यापूर्वी असलेल्या पंचायत समिती गणांची संख्या दोनने वाढून ८ झाली आहे. खडका व साकरी अशी दोन नवीन गणांची नावे आहेत. आरक्षणानुसार एकूण ८ पैकी चार ठिकाणी महिलांना संधी मिळेल. त माजी सभापती मनीषा पाटील व माजी सदस्य विजय सुरवाडे यांना आरक्षणामुळे अन्य गण शोधावा लागेल. चार माजी सदस्य मात्र सेफझाेनमध्ये आहेत. या सोडतीनंतर स्थानिक पातळीवर इच्छुकांकडून निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय बांधणीचे प्रयत्न अधिक वेगाने होतील.
गणनिहाय स्थिती अशी : वराडसीम गण : ओबीसी महिलेसाठी आरक्षित होता. सभापती मनीषा भालचंद्र पाटील येथून सलग तीनवेळा निवडून आल्या. आता हा गण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला. कुऱ्हा गण : यापूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या या गणातून सुनील महाजन निवडून आले होते. हा गुण पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाला. शिवाय नव्याने तयार झालेल्या साकरी गणाचे आरक्षण ओबीसी महिला निघाले.
गणनिहाय आरक्षण.. खडका - सर्वसाधारण (जनरल), कंडारी - सर्वसाधारण, निंभोरा बुद्रूक - सर्वसाधारण महिला, हतनूर-अनुसूचित जमाती महिला, तळवेल - ओबीसी, साकरी- ओबीसी महिला, वराडसीम- अनुसूचित जाती महिला, कुऱ्हा- सर्वसाधारण.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.