आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे प्लॉट विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांचे बनावट आदेश व शिक्के तयार करून विक्री केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यात पोलिस कोठडीची मुदत संपल्याने धांडे यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात अजूनही संशयित वाढण्याची शक्यता डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केली.
भुसावळ शहरातील जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांची बनावट सही व शिक्का याचा वापर करत संस्थेचे दहा प्लॉट परस्पर विक्री केले. या प्रकरणी धांडेसह संस्थेचे प्लॉट घेणाऱ्या १० जणांविरुद्ध भुसावळ शहर पााेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करत आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित रवींद्र धांडे याची पोलिस कोठडी शनिवारी संपल्याने त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने धांडेला न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्याची रवानगी सबजेलला करण्यात आली. मात्र, या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.