आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री १०८ विशेष सागरजी महाराज यांचे फैजपूरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. जामनेर येथील चातुर्मास संपन्न करून नाशिक येथील मांगीतुंगी यात्रा करून पुन्हा जामनेर व भुसावळ, पाडळसेमार्गे मुनींचे सोमवारी सकाळी ८ वाजता फैजपुरात आगमन झाले. शहरातील छत्री चौकात त्यांचे आगमन होताच भाविकांनी स्वागत केले. छत्री चौक, सुभाष चौक, खुशालभाऊ रोड, जुने म्युनिसिपल हायस्कूल, रथ गल्लीमार्गे चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात त्यांचे आगमन झाले. शहरात ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात चंद्रप्रभू भगवान महामस्तकाभिषेक तसेच आचार्य विमलसागरजी महाराज यांच्या प्रतिमेचा महामस्तकाभिषेक श्री विशेष सागरजी महाराज यांच्याहस्ते करण्यात आला.
माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन यांच्याकडे आहार दिनचर्या करण्यात आली. विशेष सागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात आई-वडिलांची सेवा करा, गुरुचा व संतांचा आदर करा. संतांच्या विचारकार्याचा प्रचार प्रसार करावा, मुलांनी मोबाईलचा वापर टाळावा, नियमित वाचन करावे, असा संदेश दिला. यावेळी फैजपूर, सावदा येथील जैन समाज बांधव, बालगोपाल तसेच माजी नगरसेवक संजय रल, केतन बाणाईत, विलास सपकाळे यांची उपस्थिती होती. ठिकठिकाणी भाविकांनी औक्षण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.