आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:चिनावल येथील शिबिरात ८० दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

चिनावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चिनावल येथील नवनगर गणेश मंडळाने गणेशोत्सवानिमित्त रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात ८० दात्यांनी रक्तदान केले. नवनगर मित्र मंडळ व मधुराज बिल्डकाॅन, रेडप्लस ब्लड बँक जळगावच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या नवनगर मंडळाचे फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, सावद्याचे एपीआय देविदास इंगोले यांनी रक्तदान शिबिरस्थळी भेट देवून कौतुक केले.

रक्तपेढीचे राजेंद्र चंद्रहास, दीपक पाटील, धिरज पाटील, मनीष पाटील उपस्थित होते. नवनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र महाजन, उपाध्यक्ष लोकेश पाटील, उपसरपंच परेश महाजन, योगेश ठोंबरे, मंदार पाटील, गौरव ठोंबरे, अमित सरोदे, मयूर पाटील, चेतन पाटील, प्रतिक इंगळे, जयेश इंगळे, कुंदन बोरोले यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...