आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वकर्मांचे पूजन:श्री विश्वकर्मा जन्मोत्सव;‎ न्हावीत महापूजेसह उपक्रम‎

न्हावी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गावातील सर्व सुतार‎ कारागीर समाजबांधवांनी मिळून‎ एकत्र येत प्रभू विश्वकर्मा जयंती‎ साजरी करण्यात आली.‎ यानिमित्त महापूजेसह विविध‎ उपक्रम राबवण्यात आले.‎ सृष्टीची निर्मिती भगवान‎ विश्वकर्मा यांनी केल्याचे मानले‎ जाते. त्यामुळे त्यांच्या माघ शुद्ध‎ त्रयोदशी या जन्मदिवशी त्यांचे‎ पूजन केले जाते. शुक्रवारी‎ येथील विश्वधराय बहुउद्देशीय‎ सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री‎ विश्वकर्मा जन्मोत्सव साजरा‎ करण्यात आला. संस्थेचे‎ संचालक चेतन सोनवणे यांच्या‎ हस्ते श्री विश्वकर्मा यांचे‎ सपत्नीक पूजन करण्यात आले.‎

भगवान विश्वकर्मांचे पूजन‎ केल्यास व्यवसायाला गती येते‎ आणि आर्थिक संकटाचा सामना‎ करावा लागत नाही, अशी श्रद्धा‎ आहे. सकाळी ८.३० वाजता‎ पूजन तर दुपारी १२ वाजता‎ महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.‎ या प्रसंगी जिल्हा दूध संघांचे‎ संचालक नितीन चौधरी, फैजपूर‎ पाेलिस ठाण्याचे सहाय्यक‎ पाेलिस निरीक्षक आखेगावकर,‎ यावल तालुका भाजपचे‎ उपाध्यक्ष यशवंत तळेले,‎ मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन‎ भानुदास चोपडे, संस्थाध्यक्ष‎ संतोष निमगडे, उपाध्यक्ष दिनेश‎ निंबाळे, सचिव दामोदर जगताप,‎ सहसचिव राहुल निंबाळे‎ संचालक गोपाळ जगताप, योगेश‎ निंबाळे, कृष्णा मिस्त्री, नितीन‎ निंबाळे, गणेश निमगडे व‎ समाजबांधव उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...