आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर:चाकूहल्ला; 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद

भुसावळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जामनेर रोडवरील हिमालय पेट्रोल पंप परिसरात आदित्य सावकारे यांच्यावर शुक्रवारी (दि.१८) जीवघेणा हल्ला झाला होता या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे तिन्ही संशयित देखील विद्यार्थीच आहेत.

नाहाटा कॉलेजमध्ये एकमेकांकडे खुन्नसने पाहतो म्हणून एक महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये वाद झाले हाेते. या वादाचे रूपांतर शुक्रवारी थेट चाकू हल्ल्यात झाले. हिमालय पेट्रोल पंपाजवळ आदित्य कैलास सावकारे (वय १७) विद्यार्थ्यावर दोघांनी चाकूने पाच वार केले.

त्याच्यावर सध्या खासगी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. शनिवारी दुपारी याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तिन्ही संशयित अल्पवयीन आहे, असे पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी सांगितले. याप्रकरणात इतरही अनेकांची चाैकशी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...