आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:घरकामगार महिलांसाठी योजना सुरू करा ; मनसे

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व घरगुती कामगार महिलांसाठी शासनाची योजना पुन्हा सुरू करावी. सध्या ही योजना बंद असल्याने घरगुती कामगारांना अनेक अडचणी येतात असा मुद्दा मनसेचे जिल्हा संघटक चेतन अढळकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांचेकडे निवेदनातून मांडला.

अढळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात कलम १० अन्वये घरेलु कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनेची तरतूद आहे. मात्र, घरगुती कामगार महिला त्यापासून वंचित आहे. ही योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली. तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, राजेंद्र निकम, आशिष सपकाळे, विनोद शिंदे, संदीप मांडोळे, गौरव कोळी, शाम पवार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...