आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील विविध कार्यालये व विभागांचे १८०० कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास सरकार उदासीन असल्यामुळे तालुक्यातील सरकारी रुग्णालय, शाळा, कॉलेजेस, नगरपालिका, तहसील, पंचायत समिती तसेच आरोग्य विभागातील हे कर्मचारी या राज्यव्यापी संपामध्ये सहभागी झाले अाहेत. त्यामुळे विविध शासकीय कार्यालये अक्षरश: अाेस पडलेली दिसली. रावेर तालुक्यात या संपामुळे सर्व शासकीय रुग्णालय शाळा, हायस्कूल, कॉलेजेस, नगरपालिका, तहसील कार्यालय, वन विभागासह अनेक सरकारी विभागांचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे.
जोपर्यंत शासन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत सर्व कर्मचारी संप करण्याच्या निर्धारावर ठाम दिसत आहेत. कर्मचारीच नसल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. सर्व कर्मचारी येथील पंचायत समिती परिसरात संप काळात उपस्थित होते. या ठिकाणी कैलास घोलाणे, विनायक चौथे, राजेंद्र फेगडे, नीलेश पाटील, रवींद्र बखाल, दिलीप पाटील, हरीश बोंडे, प्रवीण पाटील, दीपक गवई, प्रकाश महाजन, अनिल पाटील, कल्पना पाटील, सिंधू राठोड, विजय पवार, जितेंद्र गवळी, विजय गोसावी, उमेश दांडगे, तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच शेकडो कर्मचारी उपस्थित होते. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी संप स्थळी भेट दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.