आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

फैजपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल भुसावळ जिल्हा प्रांत विभागातर्फे देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या संदर्भात राष्ट्रपती यांच्याकडे पोहोचवण्यासाठी प्रांत कैलास कडलग यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.

गेल्या काही काळापासून देशभरात इस्लामिक जिहादी कट्टरता वाढत आहे जुन्नर योजनापूर्वक पद्धतशीर हल्ले होत आहेत. रामनवमीला आयोजित देशभरातील मिरवणुका वर दगडफेक आणि हल्ले केले गेले. त्या ठिकाणी कर्फ्यू लावल्याने देशभरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हिंदू समाजाने धीराने व समजूतदारपणाने वर्तन केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. दंगलखोरांची ओळख पटवून कारवाई करावी, कट्टरपंथी संघटनांवर तत्काळ बंदी घालावी. ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्यांक झाले आहे तिथे त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी आणि पोलिस चौकी सक्तीने स्थापन करावी, तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा, अधिकार द्यावे आदी मागण्या केल्या.

बातम्या आणखी आहेत...