आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औष्णीक वीज निर्मिती:दीपनगर केंद्रात येणाऱ्या चोरट्या वाटा बंद करा

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सुरक्षेच्या दृष्टीने दीपनगर औष्णीक वीज निर्मिती केंद्राचे ऑडिट केले. ९ तासांत चार किमी अंतरातील कानाकोपऱ्याची पाहणी केली. यानंतर केंद्रात प्रवेशाचे चोरटे मार्ग बंद करणे, केंद्रात ये-जा करणारी प्रत्येक व्यक्ती व वाहनाची नोंद करणे, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवावे अशी सूचना केली.डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी दीपनगर येथील औष्णीक वीज निमिर्तीच्या ६६० व ५०० मेगावॅट प्रकल्पाचे सुरक्षेसाठी ऑडिट केले.

केंद्रीय व राज्य गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह दीपनगर येथील सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी त्यांच्यासोबत होते. ६६० प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे आणि केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी माहिती दिली. सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेली पाहणी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू हाेती. अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे प्रवेशद्वार, बाहेर जाणारे मार्ग, दरराेज कोणत्या गेटमधून किती वाहने येतात? किती जणांना परवानगी .

अहवाल वरिष्ठांना देणार
दीपनगर प्रकल्पाची पाहणी केली. त्यात समोर आलेल्या उणिवांची माहिती असलेला अहवाल पोलिस अधीक्षकांना पाठवणार आहोत. तेथील अधिकाऱ्यांना सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत व्हावी यासाठी सूचना केल्या आहेत.
साेमनाथ वाघचाैरे, डीवायएसपी

बातम्या आणखी आहेत...