आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील 3 दिवस पावसाचे:वादळाचा दणका, 2 तासांत 520 हेक्टरवरील खरीप पिकांची माती ; ज्वारीचे नुकसान

भुसावळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात शनिवारी (दि.१०) रात्री १० ते १२ वाजेदरम्यान वादळी पावसाने दणका दिला. कुऱ्हेपानाचे, सुसरी, जाडगाव, पिंपळगाव या भागात सुमारे ५२० हेक्टरवरील कपाशी, ज्वारी, मका, केळी, ऊस आदी पिकांचे, तर कुऱ्हे भागात पानमळ्यांचे नुकसान झाले. केवळ दोन तासांत ६२.६ मिमी पावसाची नोंद झाल्याने पिके भुईसपाट झाली. भुसावळ शहरात देखील गेल्या २४ तासांत १६.६ मिमी पाऊस झाला. पाऊस व जोरदार वाऱ्यांमुळे मध्यरात्रीपर्यंत विजेचा लंपडाव सुरू असल्याने शहरवासी हैराण झाले.

भुसावळ तालुक्यात यंदा जून व जुलै महिन्यात अल्प पाऊस झाला. त्यामुळे अनेकांना दुबार व काही भागात तिबार पेरणी करावी लागली. यानंतर जेमतेम पावसावर खरीप हंगाम तग धरुन होता. त्यात शनिवारी रात्री १० वाजता अचानक वादळी पावसाने फटका दिला. त्यात कुऱ्हेपानाचे, सुसरी, जाडगाव, पिंपळगाव या भागातील सुमारे ५२० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी, ज्वारी, मका, केळी, ऊस आणि कुऱ्हे भागातील पानमळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. रविवारी दुपारी आमदार संजय सावकारे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी केली. कृषी व महसूल विभागाला पंचनामे करण्याची सूचना केली. तसेच शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करू असे सांगितले. दरम्यान, कुऱ्हे पानाचे भागात गेल्या वर्षी अती पावसामुळे ३५ शेतकऱ्यांच्या ज्वारीचे नुकसान झाले होते. पंचनामे होऊन अद्याप भरपाई मिळाली नाही. आता खरोखर भरपाई मिळेल का? अशी शंका काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

कुऱ्हे येथे सर्वाधिक नुकसान : भुसावळ तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांच्या सूचनेनुसार कृषी सहाय्यक एस.के.पाटील यांनी कुऱ्हापानाचे भागात भेट देऊन नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली. त्यात खंडाळा घाटीपासून मोंढाळा घाटी ते महादेव माळ व जामनेर रस्ता परिसरात सुमारे २५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले.रविवारी रात्री पुन्हा पाऊस : दरम्यान, रविवारी रात्री देखील भुसावळसह विभागात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची धास्ती अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र खरी स्थिती पंचनामे झाल्यावरच समोर येईल. तू्र्त पावसामुळे भुसावळ शहरात देखील हाल झाले.

जिल्ह्यात यलो अलर्ट जारी, १४पर्यंत पाऊस राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने सोमवारपासून त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करता १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान आयएमडीने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. १३ सप्टेंबरचा अपवाद वगळता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात देखील १२ व १४ सप्टेंबरला यलो अलर्ट आहे. त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम वायव्य दिशेने म्हणजेच दक्षिण छत्तीसगडच्या दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात जोरदार पाऊस होईल, असा आयएमडीचा अंदाज आहे.

अहवाल पाठवणार तालुक्यात शनिवारी रात्री चक्रीवादळाने पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली आहे. हा अहवाल वरिष्ठांना पाठवू. पंचनामे करण्यात येतील. अभिनव माळी, तालुका कृषी

तातडीने भरपाई मिळावी पानवेल चढवण्यासाठी शेवगा, पांजरा या झाडांचा वापर केला जातो. चक्रीवादळामुळे ही झाडे पडली. पानवेलींची पाने फाटली. पंचनामे करून मदत द्यावी. रवींद्र बारी, शेतकरी, कुऱ्हे पानाचे

बातम्या आणखी आहेत...