आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल:वादळाचा तडाखा; केळीचे मोठे नुकसान

यावल3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यावर मुसळधार पाऊस झाला. यामुळे केळीचे नुकसान झाले. शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली. खांब कोसळून तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित होता. नावरे परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने शेतीचे बांध व मातीदेखील वाहून गेली. यावल शहर व तालुक्यात गुरुवारी दुपारी तीन वाजेनंतर वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी वादळ सदृश स्थिती होती. या वादळात अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळली. यावल, दहिगाव, सावखेडासीम, साकळी, चुंचाळे, बोराळे व नावरे शिवारात कापणी योग्य झालेली केळी जमीनदोस्त होत शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

यावल तालुक्यात वादळी पावसाने केळीचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतशिवारात रस्ते वाहून गेले.

बातम्या आणखी आहेत...