आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे बंद:प्रभाग 21 मध्ये पथदिवे बंद ; महावितरण, पालिकेने हात झटकले, एकमेकांकडे बोट

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नवजीवन हौसिंग सोसायटी, हनुमान नगर, श्रीहरी नगर या सुमारे ४ हजार लोकसंख्येच्या भागातील पथदिवे गेल्या पंधरवड्यापासून बंद आहेत. या प्रकरणी महावितरण व पालिकेकडे तक्रार करुनही एकमेकांकडे बोट दाखवून दुरुस्ती होत नाही. पालिकेच्या तक्रार केंद्रांवरुनही नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही. सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्याने पथदिवे सुरू असणे गरजेचे आहे. अन्यथा चोऱ्या वाढण्याची भीती आहे.

तक्रारीला प्रतिसाद नाही, आंदोलन करणार ^महावितरणकडे तक्रार केल्यास आमच्याकडे मनुष्यबळ नाही, अशी उत्तरे मिळतात. पालिकेत तक्रार केल्यावर आमचा सबंधच नाही, असे सांगितले जाते. या प्रश्नासाठी आता आंदोलन करणार आहोत. महेंद्रसिंग ठाकूर, माजी नगरसेवक, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...