आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयास्पद मृत्यू:भुसावळच्या विद्यार्थ्याचा नागपुरात मृत्यू

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्रीराम नगरातील योगेश विजयकुमार चौधरी (वय २१) याचा नागपूर येथे महाविद्यालयाच्या इमारतीवरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हा तरुण नागपूर येथे डिप्लोमा अभ्यासिकेचे शिक्षण घेत होता. योगेश हा युवक नागपुरातील रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम शिकत होता.

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कॉलेज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून तो गंभीर जखमी झाला. सुरक्षा रक्षकांना त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. योगेशच्या मृत्यूची माहिती त्याच्याच मोबाइलवरून त्याच्या वडिलांना आल्याने कुटूंब हादरले. माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी मदत केली. मृत्युंजय मंडळाचे अध्यक्ष रवी ढगे, पप्पू पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानदेव पाटील, वासुदेव पाटील, विपुल बऱ्हाटे यांनी नागपूर गाठले. शनिवारी सकाळी नागपूर येथे शवविच्छेदन करुन मृतदेह भुसावळ येथे आणून अंत्यविधी झाले.

दोन वर्षे वाया गेल्याने नैराश्य....योगेशचे वडील विजयकुमार चौधरी हे वरणगाव आयुध निर्माणीत सेवेत आहेत. तीन वर्षांपूर्वी योगेश पुणे येथे लॉ अभ्यासक्रम करत होता. मात्र, तो नापास झाला. यानंतर त्याने नागपूर येथील रायसोनी कॉलेजात डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. तो तेथेच राहत होता. शिक्षणाचे दोन वर्षे वाया गेल्याने तो नैराश्यात होता, असेही निकटवर्तीयांनी सांगितले. कुटुंबीयांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...