आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनावश्यक अॅपने गाेपनियता धाेक्यात‎:विद्यार्थ्यांनाे सजग रहा; सायबर पाेलिस ठाण्याचे दिलीप चिंचाेलेंचा सल्ला‎

जळगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल आपला डाटा हा‎ वेगवेगळ्या माध्यमातून विकला‎ जातो. त्यामुळे विविध ठिकाणाहून ‎आपल्याला कॉल, मेसेज येत‎ असतात. काही अनावश्यक अ‍ॅप्स ‎ ‎ आपल्या मार्फत इन्स्टॉल केले‎ जातात. अशाप्रकारच्या चुकांमुळे ‎ आपली प्रायव्हसी धोक्यात येते.‎ त्यामुळे याबद्दल आपण जागरूक‎ राहणे गरजेचे आहे, असा सल्ला‎ सायबर पोलिस ठाण्यातील हेड‎ कॉन्स्टेबल दिलीप चिंचोले यांनी‎ विद्यार्थ्यांना दिला.‎ गोदावरी अभियांत्रिकी‎ महाविद्यालयात पोलिस रायझिंगडे‎ ‎ ‎निमित्त सायबर सिक्युरिटी या‎ विषयावर कार्यक्रम झाला. या वेळी‎ प्रमुख मार्गदर्शक म्हणून हेड‎ कॉन्स्टेबल दिलीप चिंचोले, स्वाती‎ पाटील, प्रवीण वाघ हे उपस्थित‎ होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎ केले. सायबर क्राइम गुन्ह्यांबद्दल‎ ग्रामीण भागात लोकांना‎ ‎जागरूकता कमी आहे. त्यामुळे‎ तरुण वर्गाने पुढाकार घेऊन‎ वेळोवेळी अवेअरनेस प्रोग्राम‎ घेण्याची गरज आहे. या माध्यमातून‎ त्यांनी युवकांना हे कार्य‎ करण्यासाठी आवाहन केले.‎ सायबर सिक्युरिटीत विद्यार्थ्यांसाठी‎ संधी असल्याचे त्यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...