आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित, नैसर्गिक वनस्पतीजन्य उत्पादनांच्या प्रदर्शनाचे तसेच प्राणिशास्त्र विभागातर्फे आयोजित पक्षांच्या विविध घरट्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन, प्राचार्य प्रा. अरविंद चौधरी व प्रो. कामिनी तिवारी यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले. यावेळी वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना शारिरीक व्याधींवर उपयुक्त, स्वत: तयार केलेली उत्पादने माहितीसह सादर केली.
विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण होऊन त्यातून त्यांची सृजनशक्ती विकसित व्हावी, तसेच त्यांना विषयाची सांगड व्यवसायसोबत घालता यावी जेणेकरून उपजिविकेसोबत त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, असे वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. गीता पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट नमूद करतांना सांगितले. प्रा.अरविंद चौधरी यांनी या उपक्रमाचे कौतूक केले. विद्यार्थ्यांना भविष्यात अशाच प्रकारच्या माध्यमातून उत्पादने बनवून त्यांचे मार्केटिंग व विक्री करण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी डॉ. अजय पाटील, डॉ. मनोज निकाळजे, डॉ. रत्ना जवरास, प्रा. प्रभाकर महाले उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांचे कौतूक करून उत्साह वाढवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. विनोद चौधरी, प्रा. संदीप बरडे, प्रा. नरेंद्र जोशी, डॉ. ईश्वर म्हसलेकर, प्रा.नीतेश सावदेकर, प्रा.नीलेश महाजन, समीर पाटील, नामदेव बडगुजर, विजू धोबी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.
अशी उत्पादने मांडली
वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने स्वतः बनवलेली उत्पादने जसे विविध वनस्पती व त्यांच्या अर्कापासून केसांच्या विविध समस्या, चेहऱ्यावरील डाग, मुरूम, वेगवेगळे हेअर आणि फेस पॅक, लीप बाम, कोरफड जेल, हर्बल शाम्पू, स्क्रब इत्यादी उत्पादने त्याचप्रमाणे औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींपासून बवासिर, खोकला, संधिवात, गुडघेदुखी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, मुरलेला ताप इत्यादी आजारांवर विविध प्रकारचे तेल, सिरप, चूर्ण बनवून त्यांची शास्त्रीय माहिती अभ्यासपूर्ण सादर केली.
घरट्यांची दिली माहिती
प्राणिशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजुला आढळणाऱ्या विविध पक्षांची घरटी जमा करून त्यांची शास्त्रीय माहिती पोस्टर स्वरूपात सादर केली. यात सुगरण, बुलबुल, सिस्टिकोला, हमिंग इत्यादी पक्षांची घरटी मांडली होती. निसर्गातील कलाकृती व त्यांचा अभ्यास करून ज्ञान वृद्धिंगत करण्याचा उद्देश यामागे असल्याचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. चेतनकुमार शर्मा व डॉ. रुपाली तायडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.