आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:‘आरटीई’तील 70 रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मिळणार संधी

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के जागांच्या प्रवेश प्रक्रियेत भुसावळ तालुक्यातील २० शाळांमधून ३०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. ७० विद्यार्थ्यांचे प्रवेश १० मे पर्यंतच्या वाढीव मुदतीमध्येही झाले नाहीत. या रिक्त जागांवर आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. या प्रवेशासाठी आता २७ मे पर्यंत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. या जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. शिक्षण विभागातर्फे २०२२- २३ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून लॉटरी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. वारंवार मुदतवाढ देऊनही तालुक्यात ७० जागांवरील प्रवेश होऊ शकेल नाहीत. या रिक्त जागांवर आता प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, २७ मे दरम्यान प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी प्रतीक्षा यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाइलवर एसएमएस प्राप्त होतील. एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून माहिती मिळेल.

बातम्या आणखी आहेत...