आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाची परंपरा:दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी सिद्ध केली गुणवत्ता, अनेक शाळांचा निकाल 100 टक्के

भुसावळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह तालुक्यातील बहुतांश शाळांनी दहावीच्या निकालात शंभरी गाठली. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी निकालाची परंपरा कायम राखली. कन्याशाळेचा निकाल १०० टक्के येथील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये प्रेरणा सुनील चौधरी ही विद्यार्थिनी ९१.४० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम आली. तर तनुजा सलीम तडवी ८९.८० टक्के गुण मिळवत व्दितीय, क्रांती रविंद्र पाटील ८९.६० टक्के गुण मिळवत तृतिय, तन्वी विश्वनाथ पाटील ८९ टक्के गुण मिळवत चतुर्थ तर संजनी संतोष पाटील ८८.६० टक्के गुण मिळवत पाचवी आली आहे. या सर्व विद्यार्थिनीचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सरदार पटेल स्कूलचा निकाल १००% सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी दहावीचे दहा विद्यार्थी होते. या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन करून शाळेचे नाव लौकिक केले आहे. विशेष म्हणजे नर्सरी पासून ते दहावीपर्यंत या विद्यार्थ्यांनी याच शाळेत शिक्षण घेतले आहे. यात पृथ्वी रमेश तायडे ८६ टक्के गुण मिळवत प्रथम, तमन्ना फिरोज तडवी ८३.८० टक्के गुण मिळवत द्वितीय, ओम चौधरी ८३.४० टक्के गुण मिळवत तृतीय आला. तर हिमांशू तडवी ८२.४०, युगल नाफडे ८०.२०, शेख बाशीद ७७, अबरार खान ७६, जुनेद खान ७२.८०, शेख रेहमान खान ७३.४०, रेहान खान ६४.८० असे गुण मिळवून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, चेअरमन, संचालक मंडळ, मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सातपुडा विद्यालय नायगाव शाळेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. यात यश शशिकांत जवागे ८८ टक्के गुण मिळवत प्रथम, नीलेश भाऊसाहेब पाटील ८६.८० टक्के गुण मिळवत व्दितीय, भाग्यश्री अनिल पाटील ८६.६० टक्के गुण मिळवत तृतीय, तर हर्षल सुनिल जवागे ८५.२० चौथा क्रमांक आणि यश शांताराम पाटील ८५ टक्के गुण मिळवत पाचवा आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे चेअरमन, सदस्य, मुख्याध्यापक वाय.एम. नायदे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. माध्यमिक विद्यालय शिरसाड तालुक्यातील साकळी येथील शिवाजी मित्र मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय शिरसाड - साकळी चा इयत्ता दहावीचा निकाल ९१.३०लागला आहे. परीक्षेत २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी २१ विद्यार्थी घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झालेले आहेत. यात तुषार सूर्यभान सोळंके ७९.८० टक्के गुण मिळवत प्रथम, रोशन समाधान सोळंके ७९.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर गायत्री सोमा सोळंके ७९.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय आलेली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती रविंद्र सूर्यभान पाटील, संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. डांभुर्णी विद्यालय ९७.८२ टक्के डांभुर्णी येथील डॉ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालयाचा निकाल ९७.८२ टक्के लागला आहे. यामध्ये विद्यालयातून निकिता विनोद कोळी ८९.२० टक्के गुण मिळवून प्रथम, मनोज सुनील झुरकाळे ८८.८० टक्के गुण मिळवत व्दितीय, माहेश्वरी मनोज नेवे व हितेश समाधान पाटील दोघ ८८ टक्के गुण मिळवत तृतीय आले. सर्व गुणवंत्त विद्यार्थ्यांचे नवयुग विद्या प्रसारक मंडळ अध्यक्ष, चेअरमन, सर्व संचालक मंडळ आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...