आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:विद्यार्थीही करणार ई-पीक नोंदणीसाठी गावात प्रबोधन

चिनावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चिनावल (ता.रावेर) येथील विद्यार्थी आता आपल्या शेतकरी पालकांना ई-पीक नोंदणीचे महत्व पटवून देणार आहेत. शिवाय प्रात्यक्षिकातून माहिती देखील देतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना महसूल विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात प्रांताधिकारी कैलास कडलग, रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी मार्गदर्शन केले.

“माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत ई-पीक नोंदणी कार्यशाळा चिनावल येथील विद्यालयात पार पडली. रावेर तहसील कार्यालयाने आयोजन केले होते. प्रास्ताविक तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले. नंतर प्रांताधिकारी कैलास कडलग, मंडळाधिकारी जे.डी.बंगाळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार सर्वप्रथम आपल्या मोबाइलमधील जुने ॲप काढून टाकावे. ई-पीक पाहणीचे व्हर्जन-२ हे ॲप डाउनलोड करावे. नंतर ॲपनुसार टप्प्याटप्प्याने येणाऱ्या प्रक्रिया कशा पूर्ण कराव्या? ही माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे दिली.

दरम्यान, ई-पीक पाहणी उपक्रम सुरु होऊन दोन वर्षे झाली. तरीही अपेक्षित यश नाही. अनेक शेतकऱ्यांना अॅपबद्दल माहिती नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना मदत व प्रबोधन करावे, या उद्देशाने ही कार्यशाळा झाली. ई-पीक नोंदणीमुळे नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई, पीक विमा व अन्य प्रकारचे अनुदान मिळण्यास मदत होईल, असे आवाहन महसूल विभागाने केले. यानंतर विद्यार्थ्यांचे शंका निरसन करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन एम.एस.महाजन यांनी केले. चिनावल तलाठी लीना राणे, मुख्याध्यापक एच.आर.ठाकरे, उपमुख्याध्यापिका मीनल नेमाडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...