आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:सुनोदा ते मांगलवाडी रस्ता खड्डेमय, अपघाताची भीती‎

तांदलवाडी‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुनोदा, तांदलवाडी फाटा ते‎ मांगलवाडी रस्ता कित्येक‎ महिन्यांपासून अत्यंत खड्डेमय झाला‎ आहे. या रस्त्यावरुन वाहन‎ चालवताना वाहन धारकांना‎ तारेवरील कसरत करावी लागते.‎ जीव मुठीत घेवून प्रवास करावा‎ लागतो.‎ हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.‎ रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे गड्डे‎ पडल्याने वाहन नेमके चालवावे‎ कसे? असा प्रश्न पडतो.‎ तांदलवाडी परिसर केळीसाठी‎ प्रसिद्ध आहे. त्यामुळे केळी‎ भरण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रक अशी‎ अवजड वाहने ये-जा करतात. मात्र,‎ गड्डे चुकवताना अपघात होतात.‎ रस्ता आधीच अरुंद असून दोन्ही‎ बाजूने काटेरी झुडपे वाढली आहेत.‎

वाहनधारक तसेच रस्त्याने ये-जा‎ करणाऱ्या शेतकरी, शेतमजूरांना‎ त्रास सहन करावा लागतो.‎ रस्त्याच्या साईडपट्टयांची वाताहत‎ झाली आहे. यामुळे दोन्ही बाजूने‎ एकाचवेळी वाहने आल्यास‎ अपघात होऊ शकतो. सार्वजनिक‎ बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींनी‎ हा रस्ता तात्काळ दुरुस्त‎ करण्यासाठी पाठपुरावा करावा,‎ अशी मागणी होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...