आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणित दिवस विशेष:विद्यार्थ्यांना पुरातन संख्या प्रकारांचे ज्ञान देण्यासाठी किन्ही येथे पर्यवेक्षकाने भरवला ‘संख्यांचा मेळावा’

वरणगाव / सुनील वानखेडे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दशमान पद्धती प्रचलित झाल्याने पुरातन काळापासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या संख्या प्रकारांचा विद्यार्थ्यांना विसर पडत आहे. या प्रकारांची ओळख व्हावी यासाठी किन्ही (ता.भुसावळ) येथील सर्वोदय हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक डॉ.पी.एस.कोळी यांनी विविध तक्ते तयार करून ‘संख्यांचा मेळावा’ हा उपक्रम सुरू केला आहे. ते ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना हे तक्ते दाखवून संख्या प्रकारांची माहिती देतात. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त त्यांच्या उपक्रमाची माहिती.

शाळेतच माहिती द्या, भविष्यात उपयोग गणिताच्या उच्च शिक्षणासाठी जुन्या संख्या प्रकारांचा उपयोग होतो. त्याबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर ज्ञान मिळाल्यास उच्च शिक्षणात अडचण येणार नाही. अंकांसोबत तुम्ही खेळलात तर इतर संख्यादेखील शोधता येतात. त्यासाठी हा उपक्रम आहे. डॉ.पी.एस.कोळी, निवृत्त पर्यवेक्षक, सर्वोदय हायस्कूल, किन्ही

भारताने जगाला शून्य दिले आणि संख्याज्ञान व दशमान पद्धती प्रचलित झाली. या व्यतिरिक्त संख्यांचे विविध प्रकार आहेत. त्याची मुख्य चार प्रकारात विभागणी करून माहिती दिली जाते. 1 पहिल्या विशिष्ट संख्या प्रकारामध्ये फिबोनिस संख्या, बेल संख्या, हर्षद संख्या, विनम्र व परिपूर्ण संख्या यांचे ज्ञान होते. 2 दुसऱ्या प्रकारात नैसर्गिक संख्या, पूर्ण, पूर्णांक, परिमेय, अपरिमेय, वास्तव, काल्पनिक, संयुक्त, मूळ, सम-विषम संख्या हे प्रकार 3 तिसऱ्या प्रकारात आकृतीबद्ध संख्येत त्रिकोणी, चौरसाकृती, आयताकृती, पंचकोनी, षटकोण, सप्तकोणी, अष्टकोणी, नवकोणी व दशकोणीय संख्या प्रकार 4 चौथ्या संख्या लेखन पद्धतीत द्विमान पद्धती, त्रिमान, चतुर्थमान, पंचमान, षष्ठमान, सप्तमान, अष्टमान, नवमान, दशमान, एकादश, द्वादश संख्या पद्धतीची मांडणी आहे.

बातम्या आणखी आहेत...