आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:चिनावलच्या सूरजचा प्रकल्प अविष्कारमध्ये‎ चमकला, राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड‎

चिनावल7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नूतन माध्यमिक विद्यालय व‎ वसतिगृहातील माजी विद्यार्थी तसेच सध्या संत मुक्ताबाई‎ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणारा‎ सूरज महाजन याने विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या‎ ‘अविष्कार संशोधन २०२२’ या स्पर्धेत शेतकऱ्यांच्या उपयोगी‎ असलेले ‘ऑटोफार्मर’ हे यंत्र अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान‎ गटात सादर केले.

त्यास तृतीय क्रमांक मिळाल्याने सूरजची‎ पुणे येथे जानेवारीत होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड‎ झाली. ऑटोफार्मर यंत्राद्वारे पिकांना पाइपलाइनमधून ठिबक‎ सिंचनामार्फत द्रवरूप खतांचा स्वयंचलित पद्धतीने पुरवठा‎ शक्य आहे. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सूरजचा कुलगुरू‎ डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांनी गौरव केला. त्याला प्रा.निखिल‎ मिस्त्री, प्रा.डॉ.ए.जी.कुलकर्ण ी, प्रा.डॉ.आर.एन.शेवाळे व‎ प्रा. अझरुद्दीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...