आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅसेंजर:ट्रॅकवर येण्यापूर्वीच रद्द झाली सुरत-भुसावळ पॅसेंजर, लोकभावना तीव्र

भुसावळ19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे अडीच वर्षांपासून बंद असलेली सुरत-भुसावळ पॅसेंजर पश्चिम रेल्वेने बुधवारपासून पुन्हा (८ जून) सुरू करण्याची घाेषणा केली होती. मात्र, ही गाडी सुरू होण्याआधीच अनिश्चित काळासाठी रद्द केली. त्यामुळे खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमान्यांच्या आनंदावर विरजण पडले. गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटणार होती. दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ वाजता भुसावळ स्थानकात पोहोचणार होती. मात्र, ही गाडी सुरत स्थानकातून सुटण्याआधीच रद्द केल्र्याचे पश्चिम रेल्वे स्पष्ट केले. गाडीची माहिती ऑनलाइन सिस्टिममधून काढून टाकल्याने कुठेही बुकिंग झाले नाही. खान्देशातून सुरतकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांसाठी ही गाडी अतिशय सोयीची होती. मात्र, ट्रॅकवर येण्यापूर्वी गाडी रद्द झाल्याने हिरमोड झाला.

पत्रात कारण नमूद नाही ^पश्चिम रेल्वेच्या पत्रानुसार सुरत-भुसावळ-सुरत ही पॅसेंजर गाडी पुढील आदेशापर्यंत सुरू होणार नाही. गाडी रद्द करण्याचे काहीही कारण आम्हाला प्राप्त पत्रात नमूद करण्यात आलेले नाही. बी. अरुणकुमार, मंडळ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...