आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमाची पायमल्ली:आश्चर्य ;  उपशिक्षकाकडे चार पदांचा पदभार

रावेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शिक्षणाचा अधिकार २००९ कलम २७ ची पायमल्ली करून एका उपशिक्षकाकडे ४ पदभार दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आर्थिक व्यवहाराचे अधिकार नसताना “त्या’ उपशिक्षकाकडे गट समन्वयकाचा पदभार देऊन बँक खातेही उघडले आहे.

पंचायत समितीत गट समन्वयकाचा पदभार नियमानुसार शिक्षण विस्तार अधिकारी दर्जाच्या व्यक्तीकडे हवा. रावेरात मात्र हा पदभार गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाकडे दिला आहे. या कर्मचाऱ्याचे (गट समन्वयक असलेल्या उपशिक्षकाचे) बँकेत खाते देखील उघडले आहे. त्यांच्या स्वाक्षरीने १४ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार निघतात. केवळ गट समन्वयक म्हणूनच नव्हे तर त्या उपशिक्षकाकडे इतरही तीन पदभार आहेत. मागणी करूनही दखल नाही : २ ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षण विस्तार अधिकारी विलास कोळी यांनी बीडीओंकडे लेखी अर्ज देऊन गट समन्वयक म्हणून पदभार देण्याची मागणी केेली. या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती समोर आली.

तत्काळ माहिती घेणार
सदर गटसमन्वयक पदावर उपशिक्षकाची निवड करता येते की नाही? याबाबत नियम पाहून सांगता येईल. मात्र, ही निवड गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने केली जाते. याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेऊ. गरजेनुसार सुधारणा करू.
दीपाली कोतवाल, बीडीओ, रावेर

बातम्या आणखी आहेत...