आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण अहवाल:औरंगाबाद-भुसावळ मार्गाचा सर्वेक्षण अहवाल महिनाभरात

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-भुसावळ या १६० किमी मार्गाचे रेल्वे प्रशासनाकडून गेल्या चार महिन्यांपासून प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येत असून या सर्वेक्षणाचा अहवाल महिनाभरात मुख्यालयात व तेथून रेल्वे बाेर्डाला सादर केला जाणार आहे.

भुसावळ येथून औरंगाबादसाठी नवीन रेल्वेलाइन टाकण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने रेल्वे बाेर्डाच्या सूचनेनंतर या मार्गावरील प्राथमिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल येत्या महिन्यात रेल्वे प्रशासनाला प्राप्त हाेणार आहे. जालना -जळगाव या मार्गाचा सर्वेक्षण अहवाल नाेव्हेंबर महिन्यात रेल्वे बाेर्डाला सादर करण्यात आला. जालना- खामगाव या मार्गाचाही अहवाल मुख्यालयास सादर केला आहे .

बातम्या आणखी आहेत...