आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल:सुरवाडे बुद्रूक गावातील बालविवाह अखेर रोखला ; निवावी नावाने प्राप्त तक्रारीची घेतली दखल

बोदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सुरवाडे बुद्रूक येथील २८ वर्षीय तरुण व रावेर तालुक्यातील १७ वर्षीय तरुणी यांचा बुधवारी होणारा बालविवाह रोखण्यात यश आले. यापूर्वी भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे देखील दोन बालविवाह रोखण्यात आले होते. मंगळवारी रात्री बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना निनावी नावाने सुरवाडे बुद्रूक येथे बालविवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय व महिला बालविकास अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली. बुधवारी सुरवाडे बुद्रूक हे गाव गाठून होणारा बालविवाह रोखला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. संरक्षण अधिकारी प्रतीक पाटील, जिल्हा बाल संरक्षण कर्मचारी आकाश मराठे, चाईल्ड लाईनची टीमचे कुणाल शुक्ला, प्रसन्न बागल व बोदवड पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन बालविवाह रोखला. वर, वधू पक्षाकडील लोकांना बाल कल्याण समिती पुढे हजर करून कायदेशीर समज दिली. यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीला जळगाव येथील बालकल्याण वसतिगृहात पाठवले.

बातम्या आणखी आहेत...