आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत गुन्हा दाखल:रिक्षा पंक्चर केल्याचा संशय;  शेजाऱ्यावर मालकाचा हल्ला

भुसावळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील इंदिरानगर भागात घरासमोर लावलेली रिक्षा पंक्चर केल्याच्या संशयातून एकावर धारदार वस्तूने वार करण्यात आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

इंदिरानगर भागात सचिन जैन यांच्या घरासमोर संतोष झाडे यांची रिक्षा लावली होती. ती जैन यांनी पंक्चर केल्याच्या रागातून त्यांनी हातातील धारदार वस्तूने सचिन याचे हात, हनुवटी व मानेवर वार केला. तसेच मारहाण केली. जैन यांची आई मीनाबाई ही भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. सचिन जैन यांच्या फिर्यादीवरून झाडेविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...