आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूट:ट्रक लूट प्रकरणातील संशयित महिला पोलिसांच्या जाळ्यात

पारोळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रक लुटीच्या गुन्ह्यातील महिला आरोपीला पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवघ्या ८ दिवसात या गुन्ह्यात ३ पुरुष व एक महिलेला अटक करण्यास पारोळा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पारोळा येथे महामार्ग क्रमांक सहावर ४ रोजी मध्यरात्री दोन ट्रक चालकांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाइलची चोरट्यांनी लूट केली होती. या प्रकरणात कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अनुभवाच्या बळावर अवघ्या काही तासात ३ स्थानिक संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर या संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक केली होती. परंतु, या गुन्ह्यात एक महिला संशयिताचा ही समावेश असून ती फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित महिला व शहरातील राजीव गांधी नगरमधील रहिवासी ज्योती पाटील ही तिच्या जावयाच्या घरी जात असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. प्रवासादरम्यान या महिलेला पारोळा पोलिसांनी सापळा रचून आडगाव येथे ताब्यात घेतले. पाेनि रामदास वाकोडे, पोउनि जाधव व पथकाने ही कामगिरी केली.

बातम्या आणखी आहेत...