आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळेच्या पहिल्याच दिवशी भुसावळ शहरासह तालुक्यातील २०२ शाळांमध्ये ६४ हजार ३५७ पैकी ५४ हजार २१२ विद्यार्थी हजर हाेते. पुष्पवृष्टी करत व मिठाई आणि पुस्तके देऊन या सर्व विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले.
अहिल्यादेवी कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका मानसी कुळकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील यांनी विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके वाटप केली. सूत्रसंचालन नाना पाटील, प्रशांत देवरे यांनी केले. महाराणा प्रताप विद्यालयात मुख्याध्यापक सुरेश शिंदे व पर्यवेक्षक नारायण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाल विद्यार्थ्यांची बँड पथकासह प्रभातफेरी काढण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव करून स्वागत केले. यानंतर मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले. होली एंजेल इंग्लिश मीडियम स्कूलला रंगीबेरंगी फुगे, फुलांच्या माळा, पताकांनी आणि रांगोळ्या काढून सजवले होते. विद्यार्थ्यांना करमणुकीसाठी मिकी-माऊसने चॉकलेट वाटप केले. शाळेच्या अध्यक्षा जाॅईसी फ्रान्सिस उपस्थित होत्या. संत गाडगेबाबा हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सव साजरा झाला. संस्थेचे संचालक विनोद चौधरी यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप झाले. मुख्याध्यापक किरण पाटील व शिक्षक उपस्थित होते. जे.जे.वाणी यांनी सूत्रसंचालन केले.
शास्त्री विद्यालयात प्रत्येकाला शैक्षणिक साहित्य भेट
तालुक्यातील पिंपळगाव बुद्रूक येथील शास्त्री विद्यालयात मुंबई येथील उत्तुंग भरारी फाउंडेशनतर्फे नितीन पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला कंपास पेटी भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव सरोदे, पुंडलिक सरोदे, मुख्याध्यापिका एस.जी.तडवी, पी.व्ही.माळी, के.आर. पाटील, योगेश भोळे, सूरज राणे, ए.डी.इंगळे, सुरेश डांगे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.