आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्यचक्षूंसाठी रेल्वेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून सुविधाही निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे दिव्यचक्षू यांनी सरकारकडून मिळत असलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन सक्षम फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा कौन्सिलर आरती चौधरी यांनी केले. येथील खान्देश अंध कल्याण सोसायटी व अंजाळे अंध महिलाश्रम आयोजित अपंग सहाय्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थित दिव्यचक्षूंना चार खाती जेवणाच्या डब्यांचे वितरण करण्यात आले.
येथील लिलया हॉलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता झालेल्या कार्यक्रमात गव्हाळे दांपत्य, रेखा तळेले यांच्यातर्फे अन्नदान कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी सक्षम कौन्सिलिंगच्या आरती चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घरडे उपस्थित होते. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र फेगडे, अर्चना फेगडे, प्राची राणे, डॉ.बाळू पाटील उपस्थित होते. खान्देश अंध कल्याण सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. निरीक्षक घरडे यांनी सांगितले की, रेल्वेच्या अंतर्गत कोणी दिव्यांग आले तर आम्ही मदतीला तत्पर आहोत. काहीही अडचण आल्यास आमची मदत घ्या आणि समस्येवर मात करा. देव जेव्हा माणसाला एखादा अवयव कमी देतो त्याबदल्यात दोन अधिक चांगल्या गोष्टी देत असतो. आज शासन, रेल्वे प्रशासन व खाजगी संस्था दिव्यचक्षू व्यक्तींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम करत असून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चौधरींनी केले. यशवंत गव्हाळे, प्रमिला गव्हाळे, शिरीष गव्हाळे, वैशाली गव्हाळे, सुनीलकुमार तिवारी, मंदाकिनी तिवारी, नारायण विसपुते, सुनंदा विसपुते आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.