आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:पालिकेची निवडणूक लांबण्याची चर्चा; प्रभाग रचनेवर हरकती घेणे मात्र सुरूच

भुसावळ7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पालिका निवडणुकीसाठी शहरात प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य शासनाने मध्य प्रदेश पॅटर्ननुसार राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार, प्रभाग रचना व आरक्षणाचा अधिकाराबाबत कायदा केला. या कायद्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्याने आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाविना की राज्य शासनाच्या नवीन कायद्यानुसार निवडणूक लांबतील? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोंधळाची शहरातील राजकीय पटलावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कोंडी झाली. त्यावर मार्ग काढत राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाचा निवडणुकीच्या तारखा म्हणजे निवडणूक कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार स्वत: कडे घेण्यासाठी विधेयक आणले. मध्य प्रदेश पॅटर्ननुसार महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर केले होते. या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली. मात्र, यापूर्वीच गुरुवारी शहरातील पालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. एकीकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश, तर दुसरीकडे राज्य शासनाने केलेला नवीन कायदा. यामुळे पुन्हा राजकीय गोटात निवडणुकीबाबत संभ्रम आहे. दुसरीकडे प्रभाग रचना झाल्यानंतर इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र, आता निवडणूक पुढे लोटली जावून प्रभाग रचना नव्याने होईल अशी चर्चा सुरु झाली आहे.

१७ मार्चपर्यंतची मुदत....पालिका निवडणुकीबाबत जबाबदार अधिकारी अजूनही स्पष्टपणे बोलत नाहीत. राज्य निवडणूक आयोग व महाराष्ट्र शासनाकडून ज्या प्रमाणे सूचना येतील, त्यानुसार पुढील प्रक्रिया होईल. सध्यातरी गोंधळात गोंधळ असला तरी पालिकेने प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर हरकतींची प्रक्रिया सुरु ठेवली आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १७ मार्चपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती स्वीकारल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...