आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकनियुक्त सरपंचपदामुळे चुरस:तळवेल, कन्हाळेसह सहा ग्रा.पं.ची निवडणूक

भुसावळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या तळवेलसह पिंपळगाव खुर्द, ओझरखेडा, कन्हाळे बुद्रूक, कन्हाळे खुर्द आणि मोंढाळे या सहा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. १८ डिसेंबरला मतदान होईल. त्यात लोकनियुक्त सरपंचपदी आपला उमेदवार निवडून आणताना स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागेल.या निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार १८ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस जाहीर करतील.

यानंतर २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर माघारीसाठी ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत शेवटची मुदत आहे. यानंतर १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान घेण्यात येईल. २० डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील तळवेल ही राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. शिवाय पिंपळगाव खुर्द, ओझरखेडा, कन्हाळे खुर्द व बुद्रूक आणि मोंढाळे या ग्रामपंचायती महत्त्वाच्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...