आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरणार्थ पाण्याचे टँकर:टँकर, शीत शवपेटीचे लोकार्पण

फैजपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सोमवारी कै. विनायक दिनकर तळले त्यांच्या स्मरणार्थ पाण्याचे टँकर व शालिनी दिनकर तळले यांच्या स्मरणार्थ शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. लक्ष्मी नगरातील महालक्ष्मी मंदिरात सायंकाळी हा कार्यक्रम झाला.

साहित्यिक व.पू.होले अध्यक्षस्थानी, तर महामंडलेश्वर जनार्दन महाराज, राममनोहरदास महाराज, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, पी.के.चौधरी, नरेंद्र नारखेडे, भरत महाजन, माजी नगराध्यक्षा आशालता चौधरी, सिद्धेश्वर वाघुळदे, रवी होले, देवेंद्र बेंडाळे, भाजप शहराध्यक्ष अनंता नेहेते, किरण चौधरी, बंडू सरोदे, नरेंद्र चौधरी, राजू महाजन उपस्थित होते. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी शिक्षकांकडून होणाऱ्या ज्ञानदानाला अन्नदानापेक्षा महत्त्व आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन सिद्धेश्वर लीलाधर वाघुळदे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...