आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवरात्रोत्सवातील उपवासामुळे फळांना मागणी वाढते. या अनुषंगाने बाजारात वेगवेगळी फळे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे केवळ उन्हाळ्यातील सिझनमध्ये मिळणारा फळांचा राजा आंबा देखील बाजारात दाखल झाला असून ३०० रुपये किलोचे दर आहेत. याशिवाय केळी, सफरचंद, सिताफळ, संत्री, मोसंबी उपलब्ध आहे. मात्र, उपवासात प्रामुख्याने आंबा, काश्मिरी सफरचंद व द्राक्ष, जर्दाळू व अन्य रसदार फळांची मागणी आहे. नवरात्रोत्सवात अनेक भाविक केवळ फलाहार करतात. त्यामुळे फळांची विक्री वाढते.
केरळमधून बाजारात येतोय गुलाबकश आंबा
सध्या बाजारात सिमला सफरचंद ७० ते ८० रुपये किलो, काश्मिरी सफरचंद १०० तेे १२० रुपये, पेर १६०, चिकू ६० ते ८०, मोसंबी ४० ते ५०, डाळिंब १२० ते १६०, ग्रीन अॅपल १६०, खरबूज ६०, टरबूज ३० रुपये, केळी २० ते ३० रुपये डझन, अननस १०० ते १२० रुपये नग असे दर आहेत. यापैकी रसदार फळांना ग्राहकांकडून मागणी आहे.
यूएसए द्राक्षे ३६० ते ४०० रुपये किलो, साऊथ आफ्रिका संत्री १६० रुपये, ड्रॅगन फ्रूट १०० ते १२०, किवी १०० ते १२०, जर्दाळू २४० ते २८० रुपये दर आहेत. तर ३०० रुपये किलोचा गुलाबकश आंबा केरळमधून मुंबईतील वाशी मार्केट आणि तेथून जळगाव व भुसावळात आल्याची माहिती भुसावळ येथील व्यापारी रईस बागवान यांनी दिली.
फराळ साहित्याचे दर आहेत स्थिर
उपवासांच्या काळात साबुदाणा, भगर, शेंगदाण्यांची विक्री वाढते. यंदा या पदार्थांचे दर स्थिर आहेत. साबुदाणा ६९, शेंगदाणे १३०, भगर १२५, शेंगदाणा तेल १६० रुपये किलो आहे. राजगिरा लाडू, केळी व बटाटा वेफर्स, नॉयलॉन साबुदाणा चिवडा, चिकी या तयार फराळ साहित्याचे दर स्थिर असल्याचे व्यापारी निर्मल कोठारी म्हणाले.
हंगामातच फळ खाणे फायदेकारक
आंब्याचा सिझन जानेवारी, फेब्रुवारीपासून सुरु हाेऊन जून किंवा पाऊस पडल्यावर संपताे. त्या व्यतिरिक्त आता वेगवेगळ्या पद्धतीने १२ महिने सर्वच फळं उपलब्ध हाेतात; परंतु ती नैसर्गिकरित्या पिकवलेली नसतात. त्यासाठी केमिकलचा वापर केला जाताे. अशा फळांचे सेवन केल्याने शरीरावर विपरित परिणाम हाेताे. त्यामुळे हंगाम साेडून काेणतेही फळ खाणे टाळावे. - डाॅ. नितीन सराेदे, आहारतज्ज्ञ, जळगाव
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.