आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहिवाशांनी मागितली आमदार चौधरींकडे दाद:रावेर नगरपालिकेची कर आकारणी अन्यायकारक

रावेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर पालिकेने हद्दवाढ झालेल्या भागातील मालमत्ता धारकांना अवास्तव कर आकारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. या भागातील काही रहिवाशांनी शुक्रवारी आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेत केलेली कर आकारणी अन्यायकारक असल्याची व्यथा मांडली. त्यांनी करवाढ कमी करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

येथील नगरपालिकेने हद्दवाढ भागात टप्प्याटप्याने दरवर्षी २० टक्के प्रमाणे कर आकारणी करणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न करता सरळ ६० टक्के प्रमाणे मालमत्तेचे कोणतेही मोजमाप न करता अव्वाच्या सव्वा कर आकारणी केलेली आहे. ही कर आकारणी अवास्तव असल्याने नागरिकांनी १८०० पेक्षा जास्त हरकती घेतल्या आहेत. काहींनी २० टक्के कर आकारणी न केल्यास पालिकेचा कर भरणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, रहिवाशांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेतली. आकारलेली अवास्तव कर आकारणी कमी करावी, मालमत्तांचे पुन्हा सर्वेक्षण करावे अशी मागणी केली. रवींद्र पवार, नीलेश पाटील, शरद राजपूत अादी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...