आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदी:शिक्षकाचा मृतदेह आढळला तापी नदीत

यावल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाडळसे येथून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३७ वर्षीय शिक्षकाचा मृतदेह शनिवारी अंजाळे शिवारातील तापी नदी पात्रात आढळला. बेपत्ता होण्यापूर्वी या शिक्षकाने घरी मोबाइलवरून कॉल करून आपण खूपच अस्वस्थ आहोत, असे सांगितले होते. यानंतर त्यांचा मोबाईल शेळ्या चारणाऱ्यास तापी पात्राजवळ सापडला होता. दीपक दिनकर भारंबे असे मृताचे नाव आहे.

पाडळसे येथील मूळ रहिवासी व हल्ली जळगाव शहरातील दत्त वाडीतील रहिवासी शिक्षक दीपक दिनकर भारंबे (वय ३७) हे जळगाव येथील युवा विकास फाउंडेशन, निमखेडी शिवार, खोटेनगर, जळगाव शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस होते. ते पाडळसे ते जळगाव असे दररोज ये-जा करत होते. १८ ऑगस्ट रोजी ते पाडळसे येथून जळगाव येथील शाळेमध्ये जाण्यासाठी निघाले. मात्र, ते शाळेत पोहोचले नाही. यादरम्यान त्यांनी घरी आई-वडिलांना मोबाइलवर कॉल करून ‘आपण खूपच अस्वस्थ आहोत’ असे सांगून फोन बंद केला. दोन दिवसांनी दीपक यांचा मोबाइल कासवा (ता.यावल) येथील शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला तापी नदी पात्राजवळ मिळाला. त्याने तो मोबाइल पाडळसे येथे दीपक यांच्या कुटुंबीयांकडे आणून दिला होता.

शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह अंजाळे (ता.यावल) जवळील तापी काठावर श्री दत्त मंदिराच्या पायथ्याजवळ दिसला. मृत शिक्षक दीपक भारंबे यांच्या पश्चात पाडळसे येथे आई-वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विनोद गोसावी, हवालदार किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी घटनास्थळी आले. पंचनामा केला.

ग्रामस्थांनी केली मदत दीपकचा तापी पात्रातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी योगेश पाटील, राजू पाटील यांनी मदत केली. पाडळसे सरपंच ज्ञानेश्वर तायडे, पोलिस पाटील सुरेश खैरनार, बाजार समितीचे माजी उपसभापती योगराज बऱ्हाटे, माजी सरपंच यशवंत बऱ्हाटे, ज्ञानेश्वर बऱ्हाटे आदींनी मदत केली.

बातम्या आणखी आहेत...