आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:शिक्षक व्यक्तींसोबत समाज अन् राष्ट्रही घडवतात

मुक्ताईनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण, ते शिष्यांमधील दुर्गुणांना दूर करून त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात. गुरु रूपी शिक्षक आपल्या शिक्षणाच्या मदतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. जो रात्रंदिवस ज्ञान मिळवण्यासाठी धडपडतो आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देतो तोच तळमळीने कार्य करणारा खरा शिक्षक असतो, असे ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए.भोई यांनी सांगितले.

अंतुर्ली येथील ज्ञानोदय वाचनालयात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात आली. आताच्या शिक्षकांनी त्यांचा कृतीतून आदर्श घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यानंतर शिक्षकांचा कै.महेंद्र वाडिले कृतज्ञता पुरस्काराने सत्कार झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष एस.ए.भोई, तर सरपंच सुलभा शिरतुरे, वाचनालयाचे उपाध्यक्ष शरद महाजन, पोलिस पाटील किशोर मेढे, ग्रामविकास अधिकारी अनिल वराडे, वंदना देशमुख, मनीषा पाटील, जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख भैय्या शे. करीम, डी.आर.महाजन, जनार्दन पाटील, नामदेव माळी, विश्वनाथ पाटील, नामदेव भोई आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन बी.डी.बारी, तर आभार अनिल वाडिले यांनी मानले. ग्रंथपाल मधुकर वानखेडे, भानुदास पाटील, अनिल नावकर, शांताराम महाजन यांनी सहकार्य केले.

तालुक्यातील विविध संस्थांमधील शिक्षकांचा सत्कार कै.महेंद्र वाडिले कृतज्ञता पुरस्काराने लक्ष्मी तांबे (उपशिक्षिका, जि.प.मराठी शाळा), चंद्रकांत पाटील (उपशिक्षक, कन्या शाळा), मोहंमद इस्माईल शेख नबी (उर्दू शाळा), सेवानिवृत्त प्रा.विद्या मंडपे (ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इच्छापूर निमखेडी), मीना पाटील (उपशिक्षिका, कुसुमताई महाजन इंग्लिश मीडियम), सुभाष भोई (सेवानिवृत्त पर्यवेक्षक, एमएफटी विद्यालय अंतुर्ली), बी.एस.वानखडे (मुख्याध्यापक, रा.गो.ज्ञानोदय विद्यालय, कर्की), बी.डी.बारी (प्राचार्य, ज्ञानपूर्णा विद्यालय, इच्छापूर निमखेडी).

बातम्या आणखी आहेत...