आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात वाढ:तापमान 11 अंशांवर, ढगाळ वातावरण शक्य

भुसावळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील किमान तापमान घटले. रविवारी किमान ११, तर कमाल तापमान ३० अंशांपर्यंत खाली आले. यामुळे थंडीमध्ये काहीशी वाढ झाली. मंगळवारपर्यंत थंडी कायम राहील. त्यानंतर वातावरण ढगाळ तयार हाेऊन तापमानात वाढ हाेण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये किमान तापमानात माेठा चढ-उतार झाल्याने महिनाभर थंडीची तीव्रता कमी-अधिक हाेती. जानेवारीत पहिल्याच दिवशी तापमान ११ अंशांच्या निचांकावर आहे.

मंगळवारनंतर दाेन-तीन दिवस ढगाळ वातावरण वगळता या महिन्यातील पहिला पंधरवडाही थंडीचा असेल. किमान तापमानात घट हाेऊन पारा ८ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात शुक्रवारपासून थंडी वाढेल.

उत्तरेतील वाऱ्याचा प्रभाव या आठवड्यात उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता वाढू शकते. जानेवारीच्या पहिल्याच पंधरवड्यात थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येताे आहे.

बातम्या आणखी आहेत...