आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण व ठार मारण्याची धमकी:तलवारीने दहशत; महिलेस केली मारहाण

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या भांडणाच्या वादातून घरात घुसून महिलेस मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी राहूल पाटील व विष्णू पथरोड या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना २३ ऑगस्टला रात्री ८.३० वाजता भारत नगरमध्ये घडली.

राहूल पाटील व विष्णू पथराेड (रा. वाल्मीक नगर, ३२ खाेली, भुसावळ) हे मंगळवारी रात्री भारत नगरातील एका कुटुंबावर हल्ला करण्यासाठी गेले होते. हातात तलवार घेऊन ते फिर्यादी महिलेच्या घरात शिरले. नंतर महिलेस मारहाण व विनयभंग केला. तिच्या कुटुंबातील सदस्यांना देखील मारहाण व ठार मारण्याची धमकी दिली. महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध आर्म अॅक्ट, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...